सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (21:26 IST)

संजय राऊत एक नंबर ढोंगी आहेत : निलेश राणे

शिवसेना खासदारांच्या एका शिष्टमंडळाने दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. यामध्ये शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांचाही सहभाग होता. भाजप नेते निलेश राणे यांनी यासंदर्भात जोरदार टीका केली असून, संजय राऊत एक नंबर ढोंगी असल्याचे म्हटले आहे.
 
निलेश राणे यांनी एक ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, संजय राऊत जितक्या झटपट दिल्लीतील आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेले तसे कधी मराठा आंदोलकांना भेटले नाहीत. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आंदोलनाला संजय राऊत कधी गेले नाहीत. महाराष्ट्रातील आंदोलक नको फक्त महाराष्ट्र हे नाव राजकारण करण्यासाठी पाहिजे. संजय राऊत एक नंबर ढोंगी आहेत, अशा शब्दांत निलेश राणे यांनी सडकून टीका केली आहे.