सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (16:03 IST)

संजय राऊतांनी निर्दोषत्व कोर्टात सिद्ध करावं, मीही तेच केलंय- भावना गवळी

bhawana gavali
ईडी प्रकरणात मला कोर्टानं क्लिनचीट दिली आहे. ईडीचा विषय आता माझ्यासाठी संपला आहे. कुठल्याही गोष्टीला क्लीनचीट देण्यासाठी कोर्ट आहे. ईडीची कारवाई विशिष्ट पद्धतीनं होत असते. संजय राऊत निर्दोष असतील कोर्टात सिध्द करावं, मीही तेच केलं, असं वक्तव्यं खासदार भावना गवळी यांनी केलं आहे.
 
शिवसेनेच्या शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणार आहेत.
 
याबद्दल बोलताना भावना गवळी यांनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीसांनी खूप मोठं मनं केलं. एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं. एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करणार आहोत. हजारोच्या संख्येनं समर्थक सत्कार करणार आहेत. टीव्ही9 मराठीनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.