सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (15:09 IST)

विहिरीत तोल जावून पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथे शाळकरी मुलाचा विहिरीत तोल जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
येळपणे गावातील ठाणगेवाडी येथील अभिषेक बाळू लकडे (वय 11) हा विहिरीच्या कडेला असलेल्या बोराच्या झाडाला बोरे काढण्यासाठी गेला असता त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला व त्यामध्ये त्याचे दुर्देवी मृत्यू झाला.
तो बराच वेळ झाला तरी घरी न आल्यामुळे त्याचा शोधाशोध घेतल्यामुळे विहिरीच्या कडेला त्याची चप्पल दिसून आली व संशय आल्यामुळे बांबूच्या सहाय्याने विहिरीमध्ये पाहिले असता विहिरीत असल्याचे शंका आली बाहेर काढले असता अभिषेक हा मृतावस्थेत मिळून आला.
अभिषेक श्री खंडेश्वर माध्यमिक विद्यालय येळपणे येथे इयत्ता सहावी मध्ये शिकत होता. तो अत्यंत हुशार होता.अभिषेक चे वडील हे शेती करत आहे. व आईचे दोन वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे लकडे कुटुंबावर पुन्हा आघात झालेला आहे.