बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 10 मार्च 2024 (15:45 IST)

धक्कादायक! 9 वर्षाच्या मुलीवर महिनाभर सामूहिक अत्याचार,आरोपींना अटक

minor
श्री गौंदा तालुक्यातील दक्षिणेतील एका गावात नऊ वर्षाच्या मुलीवर दोघांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, श्री गोंदा तालुक्यात दक्षिणेकडील एका गावात एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी श्री गोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष रामभाऊ पवार आणि युवराज नंदू शेंडगे यांना अटक केली आई. या आरोपींनी बळजबरी मुलीवर एक महिन्यांपासून बलात्कार करून तिचे व्हिडीओ केले. नंतर हे व्हिडीओ मोबाईलवर नातेवाईकांनी पाहिल्यावर ही बाब लक्षात आली. नातेवाईकांनी त्यांना या बाबतीत विचारपूस केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

मात्र नंतर त्यांनी कबुली दिली. या वर अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपींवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने 14 मार्च पर्यंत कोठडी सुनावली आहे. 
 

Edited By- Priya Dixit