रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 मे 2018 (08:35 IST)

बँकेच्या सायरन वाजला, चोर नाही पाल होती

बीड जिल्ह्यातील पाटोदा गावात महेश मल्टिस्टेट बँकेत बसवलेल्या सायरनच्या सेन्सरमध्ये पाल गेल्याने अचानक हा सायरन वाजू लागला. त्यामुळे जवळपास  सर्वांचीच भंबेरी उडाली.
 
रविवारी सुट्टी असल्याने ही बँक बंद होती. सायरनच्या आवाजानंतर माहिती मिळताच बँकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र हा सर्व प्रकार पाल सायरनमध्ये घुसल्यामुळे उघड झालं.  

बीडच्या पाटोदा शहरातील बस स्टँडसमोर महेश मल्टिस्टेट बँकेची शाखा आहे.  दुपारी अचानक सुरक्षा अलार्म वाजल्याने परिसरात एकच गोंधळ उडला. सायरन वाजल्यावर नागरिकांनी बँकेकडे धाव घेतली.