गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 नोव्हेंबर 2020 (16:47 IST)

म्हणून फडणवीस यांना ‘हे सरकार पडणार’, असे सतत सांगत राहावे लागते

भाजपच्या आमदारांनी पक्ष सोडू नये म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ‘हे सरकार पडणार’, असे सतत सांगत राहावे लागते, असा टोला राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांना आपली माणसं टिकवण्यासाठी सरकार पडणार, असं बोलावं लागतं. आणखी काही काळ ते असंच बोलत राहतील. त्यानंतर फडणवीस यांचं बोलणं आपोआप बंद होईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. ते औरंगाबादमध्ये बोलत  होते
 
यावेळी जयंत पाटील यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत निर्माण झालेल्या वादावरही भाष्य केले. हा वाद मिटला आहे. तर पुण्यात बाळासाहेब थोरात आणि मी एकत्र पुण्यातील उमेदवाराचा फॉर्म भरायला जाणार आहोत. काँग्रेसची कुठलीही अडचण होणार नाही. राष्ट्रवादीच्या प्रताप माने यांना आम्ही अर्ज मागे घ्यायला लावू. पुणे पदवीधर मतदारसंघ आतापर्यंत भाजपचा होता. मात्र, आम्ही आता खेडोपाडी फिरुन मतदार नोंदणी केली आहे. त्यामुळे आता कुठलीही अडचण येणार नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.