शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 जानेवारी 2023 (21:06 IST)

अनेकदा मला अजितदादा मुख्यमंत्री असल्या सारखं वाटतं : सुप्रिया सुळे

supriya sule ajit panwar
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात स्पष्टीकरण देत असताना छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा केला. त्यावेळी त्यांनी धर्मवीर या नावावर देखील आक्षेप घेतला. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. सुप्रिया सुळे या पुण्यात  एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. बेळगाव प्रश्नावर अमित शाह यांच्यासोबत महाविकास आघाडीतील खासदाराची बैठक घेतली. त्यामुळे त्यांनी अमित शहा यांचे आभार देखील मानले आहेत.

दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलवून चर्चा केली. याप्रकरणी कोणी काही बोलणार नाही, असं अमित शहा यांनी सांगितलं. तरी देखील कर्नाटकचे मुख्यमंत्री वक्तव्य करत आहेत, असं सुळे म्हणाल्या.
 
बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या राजकारणावर  देखील भाष्य केलं. अनेकदा मला अजितदादा मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या आहेत. राजकारणातील गलिच्छ आरोप-प्रत्यारोप थांबवा. मी माझ्या पक्षापासून सुरूवात करते, अस म्हणत सुप्रिया सुळे यांनी सर्वपक्षांना आवाहन केलं आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor