गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 मार्च 2023 (08:04 IST)

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीची आत्महत्त्या, गळफास घेत संपवले जीवन

suicide
नाशिक: नाशिक मधील आडगाव परिसरातुन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आडगाव परिसरात असलेल्या म्हाडा कॉलनीमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय उच्चशिक्षण घेत असलेल्या तरुणीने गळफास घेत आत्महत्त्या केली आहे.
 
कल्याणी राजाराम फाफाळे असं मयत तरुणीचे नाव आहे. ती मूळची निफाड तालुक्यातील मऱ्हाळभोई गावाची असल्याची माहिती समोर आलीये.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणी ही नाशिकमध्ये शिक्षण घेत होती. शिक्षणानिमित्ताने ती मैत्रिणींसमवेत म्हाडा कॉलनीच्या इमारतीमध्ये भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहत होती. आज सकाळी ५ वाजेच्या सुमारास तिची मैत्रिण गेल्यानंतर तिने राहत्या खोलीत गळफास लावून घेत आत्महत्त्या केल्याचे समजले.
घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.दरम्यान, कल्याणी हिचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्यातील डाटा उडविण्यात आलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले.आत्महत्त्येमागील कारण मात्र समजू शकलेले नाही. याप्रकरणी आडगाव पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor