शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 31 जानेवारी 2022 (14:11 IST)

नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार, जामिनावर आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात सुनावणी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज  गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. तसेच10 दिवसात जिल्हा न्यायालयात शरण येण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली आहे. यांच्या जमिनीवर सुनावणी आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात होणार आहे. 
गेल्या आठवड्यात भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सरन्यायाधीश रमण्णा, न्या. हिमा कोहली आणि न्या. ए.एस. बोपण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी नितेश राणेंच्या वतीने युक्तीवाद केला. तर सरकारच्या बाजूने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळून अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण दिले. तसेच 10 दिवसांत सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण जाण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे शुक्रवारी  नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण जाण्यासाठी दाखल झाले. त्यावेळी त्यांचे बंधू निलेश राणे हे उपस्थित होते. नितेश यांच्या बाजूने  सतीश मानशिंदे आणि संग्राम देसाई वकील म्हणून होते. त्यांनी राणेंची बाजू मंडळी तर सरकारी वकील म्हणून प्रदीप घरत यांचे म्हणणे कोर्टाने मागविले होते. तसेच भूषण साळवी यांनी ऑनलाईन सरकारी वकील म्हणून आपली बाजू मांडली. आज सोमवारी सुनावणी साठी जिल्हा न्यायालयात आलेले प्रदीप घरत म्हणाले की , आमदार नितेश राणे हे सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाले असून त्यांना अटक का केले नाही .आज जिल्हा सत्र न्यायालयात नियमित जमानातीवर सुनावणी होणार आहे.     
 
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज  गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. तसेच10 दिवसात जिल्हा न्यायालयात शरण येण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली आहे. त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. तसेच नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब  कणकवली पोलिसांना शरण आले आहे. राकेश परब हे संतोष परब हल्ला प्रकरणात संशयित आरोपी आहे.