बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 जानेवारी 2023 (21:25 IST)

Akola :घरात कुणी नसल्याचा फायदा घेत काका आणि भावानेच केला लैंगिक अत्याचार

rape
अकोला : नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना अकोल्यात घडली आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर काका, मावस भाऊ आणि त्यांच्याच एका साथीदाराने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संतापजनक घटना जिल्ह्यातील बाळापूर येथे घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तिघांना अटक करण्यात आली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचे घरात कुणीही नसल्याचे पाहून वेगवेगळ्या बहाण्याने तिघांनी वेगवेगळ्या वेळी घरात घुसून मुलीवर शारीरिक अत्याचार केले. यात काका रोशन भाऊसाहेब गवई, मावस भाऊ शुद्धोधन गोवर्धन अंभोरे तसेच गावातील ज्ञानेश्वर उर्फ लाल्या बंडू शेळके यांनी हे दुष्कृत्य केले आहे.
 
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गावात संतापाच वातावरण आहे. अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी होती. हीच संधी पाहून या तिघांनी संधी साधली. या तिघांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. घटनेची माहिती मिळताच बाळापुर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
 
याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ३७६, ३७६ (अ) (ए) ३७८ (३) ३५४, ३५४ (ए) ५०६, ३४ तसेच अनुसूचित जाती-जमाती अधिनियम सहकलम ३, ४, ५, ६, ७, ८, पोटकलम ३ (२) अन्वये तिघांविरूध्द गुन्हा नोंदवून वरील तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेतले आहे. तिघांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने जिल्हा हादरवून टाकला आहे.

Edited By -Ratnadeep Ranshoor