गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 8 जानेवारी 2023 (17:41 IST)

बस चालकाचा प्रवाशांचे प्राण वाचवताना जीव गेला

death
एसटी बस चालकाचा बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे बस मधील प्रवाशांचे प्राण वाचवताना बस चालकाला स्वतःचा जीव गमवावा लागल्याची घटना वर्धा येथे बुट्टी बोरी जवळ ट्रक ला वाचवताना घडली आहे. एसटी महामंडळाची नादुरुस्त असलेल्या बसचे ब्रेक निकामी झाले. बस मधील बसलेले 26 प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी बस चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याचा डिव्हाइडरवर चढवली आणि प्रवाशांचे जीव वाचवले मात्र या अपघातात बस चालकाचा मृत्यू झाला. या अपघातामुळे बस चालकाचे प्राण गेल्यामुळे रामनगर आगारात एसटीच्या इतर बस चालकांनी नाराजगी व्यक्त केली. एसटी महामंडळाकडून नादुरुस्त गाड्या प्रवाशांसाठी पाठवत असल्याचे देखील बस चालक म्हणाले. या मुळे प्रवाशांचा जीवाला धोका असू शकतो. प्रवाशांचे जीव वाचवताना बस चालकाचा मृत्यू मुळे बस चालकांमध्ये शोककळा पसरली आहे. 

Edited By - Priya Dixit