गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 जानेवारी 2021 (08:06 IST)

आता बोला, शस्त्राच्या धाकाने सासऱ्याला लुटले, जावयासह तिघांवर गुन्हा दाखल

पुण्याजवळच्या आळंदी नगर पालिकेजवळ जावयाने त्याच्या साथीदारांसोबत येऊन सासऱ्याच्या स्नॅक्स सेंटरवर दगडफेक केली. तसेच शस्त्राचा धाक दाखवत सासऱ्याची सोन्याची साखळी आणि रोख रक्कम जबरदस्तीने चोरली. 
 
जनार्दन दत्तात्रय खोंडगे (रा. उर्से, ता. मावळ) असे जावयाचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या अन्य तीन जणांच्या विरोधात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मल्हारी उर्फ पद्माकर शंकर काळे (वय 53, रा. च-होली खुर्द) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी नगरपालिकेच्या वाहन तळाच्या शेजारी फिर्यादी काळे यांचे माउली कृपा नावाचे स्नॅक्स सेंटर आणि रसवंती गृह आहे. शनिवारी रात्री साडेआठ वाजता काळे यांचा आरोपी जावई जनार्दन त्याच्या तीन साथीदारांना घेऊन तिथे आला. त्याने काळे यांच्या स्नॅक्स सेंटर व रसवंती गृहावर दगडफेक केली.
 
त्यानंतर जनार्दन याने काळे यांच्या गळ्याला सत्तूर लावला. तर दुस-या एकाने कोयता मानेला लावून काळे यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची 80 हजारांची सोन्याची साखळी आणि 35 हजारांची रोख रक्कम जबरदस्तीने चोरूली. तसेच काळे यांना मारहाण करून आरोपी निघून गेले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.