शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जून 2023 (07:53 IST)

कोल्हापूर शहराचा विषय दंगलीपुरता संपला आहे

Deepak Vasant Kesarkar
कोल्हापूर शहरातील दिवसभराच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दीपक केसरकर हे तातडीने  कोल्हापुरात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी राज्यातील विविध राजकीय पक्षाचे नेते, विविध संघटानांच्या नेत्यासोबत चर्चा केली. यानंतर दीपक केसरकरांनी माध्यामांशी संवाद साधत कोल्हापूर शहराचा विषय दंगलीपुरता संपला आहे, अशी माहिती दिली. या बैठकीला सर्व राजकीय पक्षांचे नेते व सर्व समाजातील लोक उपस्थित होते. यावेळी कोल्हापुरात शांतता आणि सलोखा राखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शपथ घेतली, असं दीपक केसरकरांनी सांगितले.
 
सदर झालेल्या दंगलीची पूर्ण चौकशी होणार असं दीपक केसरकर यांनी सांगितले. आत्ता शांतता प्रस्तापित करणे हे महत्वाचे काम आहे. आजच्या बैठकीतुन कोल्हापूर शांत होईल यावर माझा विश्वास आहे. सर्व संघटनाच्या सदस्यांनी हात वरती करून कोल्हापूर शांत राहील याबद्दल मला आश्वासन दिल्याचं दीपक केसरकरांनी सांगितले. दंगलखोर हे कोणाशी संबंधित नसतात. या प्रकाराचे वास्तव दंगलीच्या चौकशीतून समोर येईल, असं दीपक केसरकर यावेळी म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor