गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (08:33 IST)

बाळा नांदगावकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे मेसेज व्हायरल

पुण्यातील मनसेच्या  नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे ) यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अशातच आता मनसेला मुळापासून हादरवणारा मोठा धक्का मिळणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर  प्रचंड व्हायरल  होत आहेत. राज ठाकरे  यांच्या मर्जीतले आणि मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत सुरवातीपासून असलेले  बाळा नांदगावकर  शिवसेनेत  प्रवेश करणार असल्याचे व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे. यावर मोठा गोंधळ निर्माण झाला आणि त्यावर  स्वत: बाळा नांदगावकर  यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
 
मनसे नेते  बाळा नांदगावकर मनसेत सक्रिय नसले तरी एकेकाळी त्यांच्या शब्दाला पक्षात मोठी किंमत होती. राज्यात मनसेचे वारे असताना निवडून आलेल्या पक्षाच्या आमदारांमध्ये  बाळा नांदगावकर विजयी झाले होते . राज ठाकरे यांच्यापर्यंत थेट जाऊ शकणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यामुळे त्यांना पक्षात विशेष स्थान आहे. परंतु हेच बाळा नांदगावकर परत त्यांचा मुल पक्ष शिव्सेबेत ‘घरवापसी’ करणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकर यांनी एका  न्यूज  पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत आपली बाजू स्पष्टपणे मांडली., ते सध्या  राज ठाकरे यांच्या सोबत  पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. तेव्हा ते म्हणाले आहेत कि , नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यावेळी मी राज ठाकरे यांच्यासोबत होतो. राज ठाकरे पुण्याला रवाना झाले तेव्हा मी मुंबईत परत आलो आहे . माझ्या मतदारसंघातील मनसेच्या कार्यालयाचे 18 डिसेंबरला राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे.त्याच्या तयारीसाठी मी मुंबईत परत आलो.मात्र मी पुण्याच्या दौऱ्यात न दिसल्याने काहीजणांनी मी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठवल्या.मात्र, त्यामध्ये तथ्य नसल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.