बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (21:38 IST)

या जिल्ह्यात पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्‍यक्‍तींनी एकत्र येण्‍यास सक्‍त मनाई

अहमदनगर जिल्हयात विविध राजकीय पक्ष, संघटना यांचे वतीने विविध मागण्यांसाठी रास्तारोको, मोर्चा, धरणे आंदोलन इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत असतात. त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. तसेच एस.टी. महामंडळाचे विविध संघटनानी एस. टी. कर्मचा-यांचे विलगीकरण राज्य शासनामध्ये व्हावे,कर्जमाफी, कामगार करार इत्यादी मागण्यांसाठी बंद पुकारलेला असून अहमदनगर जिल्हयात 11 ठिकाणी एस. टी. महामंडळ कर्मचा-यांचे आंदोलने चालू आहेत.या आंदोलनात्मक कार्यक्रमावेळी मोठया प्रमाणात गर्दी होणेची शक्यता असून कोणत्याही प्रकारच्या किरकोळ घटनावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये किंबहूना तशी परिस्थिती निर्माण झाल्यास ती हातळण्यास पोलीसांना मदत व्हावी, यासाठी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हादंडाधिकारी अहमदनगर यांनी त्‍यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार अहमदनगर जिल्हा महसूल  सिमेच्या हद्दीत दिनांक 22/11/2021 रोजीचे 00.01 वाजलेपासून ते दिनांक 28/11/2021 रोजीचे 24 वाजेपर्यंत फौजदार प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधात्‍मक आदेश जारी केले आहे. या कालावधीमध्‍ये पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्‍यक्‍तींनी एकत्र येण्‍यास सक्‍त मनाई राहील.