बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जुलै 2021 (08:55 IST)

“तालिबानी संस्कृतीलाही लाजवेल असे ठाकरे सरकार,” आशिष शेलार संतापले

विधीमंडळाच्या पावासाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी व विरोधक समोरा-समोर आले, एवढच नाही तर अध्यक्षांच्या दालनाबाहेर विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. यामुळे सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान या कारवाईवरुन संताप व्यक्त करत विरोधीनेत्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. दरम्यान भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर तिखट शब्दात टीका केली आहे.
 
आशिष शेलार म्हणाले, “ सभागृहात जी घटना घडली आणि त्यावर ज्या पद्धतीची शिक्षा सुनावली गेली. हा सगळा प्रकार बघितल्यावर तालिबानी संस्कृतीला सुद्धा लाजवेल, असे नवे तालिबानी ठाकरे सरकार निघाले. त्यामुळे हे नवे तालिबानी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाने महाराष्ट्रात राज्य करू पाहत आहेत. याचा मी जाहीर निषेध करतो.”