मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (13:22 IST)

सत्य नेहमी जिंकते - नवाब मलिक

राजकीय षडयंत्र करुन अनिल देशमुख यांना अडचणीत आणण्यात आले. आता न्यायालयीन लढाई लढली जात आहे. जे सत्य आहे ते समोर येईल. सत्य नेहमी जिंकते अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अनिल देशमुख प्रकरणात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
 
अँटिलिया बॉम्ब प्रकरण हे का घडवण्यात आले. त्याची कारणे काय? परमवीरसिंग यांचा त्यामध्ये रोल काय आहे. एनआयए काय सत्य लपवत आहे आणि परमवीरसिंग यांना केंद्रसरकार का वाचवत आहे हे सत्य न्यायालयीन लढाईतून समोर येईल असेही नवाब मलिक म्हणाले.
 
केंद्रीय तपास यंत्रणांचा कसा वापर होतो. कसं बदनाम केलं जातं आणि अडचणीत आणायचं व सरकारला बदनाम करायचं हे यावरून स्पष्ट दिसत आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
 
राज्यातील आयटी घोटाळ्यातील सुत्रधार अमोल काळे व इतर भारत सोडून पळून गेले आहेत. काही दुबईत तर काही लंडनला आहेत असेही नवाब मलिक म्हणाले. या लोकांची गृहखात्याकडून चौकशी सुरू होईल त्यावेळी त्यांना भारतात आणण्यासाठी केंद्रसरकारच्या माध्यमातून राज्यसरकार प्रयत्न करेल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.