रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 जून 2020 (10:42 IST)

Unlock 1: राज्यभरात काय बंद- काय चालू राहणार, जाणून घ्या

काय सुरु
खासगी कार्यालयं 10 टक्के किंवा 10 कर्मचारी घेऊन काम सुरु करण्यास परवानगी
विद्यापीठ, शाळा, कॉलेजमधील कर्मचारी इ-कंटेट विकसित करणे, उत्तर पत्रिकांचं मूल्यमापन करणे, निकाल जाहीर करण्याची काम करु शकतात
मुंबई महानगर भागात प्रवास करता येणार
सरकारी, खासगी कार्यालयातील कर्मचारी आणि स्वयंरोजगार असणारे ओळखपत्र दाखवून बेस्ट बसमधून प्रवास करु शकतात
घराबाहेर व्यायामासाठी परवानगी
जॉगिंगला काही अटींवर परवानगी
मैदानावरील व्यायामासाठी सकाळी 5 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सूट
प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट-कंट्रोल आणि इतर टेक्नोलॉजी सारख्या व्यवसायिकांना कामे करता येतील
सम-विषमनुसार मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स व्यतिरिक्त बाजारपेठेतील अन्य दुकाने सकाळी 9 ते 5 वेळेत उघडी राहतील
 
काय बंद
शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, शिकवणी वर्गवर बंदी
सलून, पार्लर बंद
लोकल वाहतूक, मेट्रो रेल्वे सेवा पूर्णपणे बंद
परवानगी नसलेल्या रेल्वे आणि विमान प्रवासावर बंदी
चित्रपटगृहे, मनोरंजन पार्क, बार, मोठे सभागृह बंद
सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम तसेच मोठे समारंभांना बंदी