रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 जून 2023 (21:30 IST)

शिर्डीत विठ्ठल भक्तीचा गजर! आषाढी एकादशीनिमित्त १२ टन खिचडीचा महाप्रसाद

sabudana
शिर्डी: आषाढी एकादशी निमित्त आज शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी साई प्रसादालयात खास साबुदाणाच्या महाखिचडीचा प्रसाद देण्यात आला आहे. तब्बल 11 ते 12 टन साहित्याचा वापर यासाठी करण्यात आला . सबका मालिक एक संदेश देणा-या साईबाबांच्या दर्शनासाठी आज एकादशीच्या दिवशी भाविकांनी गर्दी केली आहे.आषाढी एकादशी हा उपवासाचा दिवस लक्षात घेऊन भाविकांसाठी आज खास साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद देण्यात आला आहे.
 
सकाळी नाश्ता तसेच भोजनातही उपवासाची खिचडी देण्यात आली. साबुदाणा खिचडी ,शेंगदाण्याची आमटी आज प्रसादलाय बनवली जात असून हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतील असा अंदाज घेत साईसंस्थानने तयारी केली आहे. खिचडीचा प्रसाद बनवण्यासाठी 12 टन उपवासाच्या साहित्याचा वापर करण्यात आलाय. साबुदाणा 6 हजार किलो , शेंगदाणे 5 हजार किलो, बटाटा 2 हजार किलो यासह साखर मिरचीचा वापर महाखिचडी बनवण्यासाठी वापरण्यात आले आहे.
 
शिर्डी पंचक्रोशीतील स्थानिक भाविक आवर्जून या प्रसादरुपी खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात देशभरातून आलेल्या भाविकांनाही आज प्रसाद भोजनात भाजी, पोळी , वरण – भाताऐवजी साबुदाणा खिचडी मिळत असल्याने भाविकांनीही समाधान व्यक्त केलय.