बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जानेवारी 2018 (08:42 IST)

पाणी दर वाढले आणि पाणी महाग

राज्यातील असलेल्या महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने घरगुती, औद्योगिक,कृषी सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यासाठी नवे दर सरकारने निश्चित केले आहेत. सात वर्षांनंतर पाणी दर  वाढ करण्यात आली आजे. यामध्ये प्राधिकरणाने  ग्रामपंचायतींपासून महापालिकांपर्यंत सर्वच ठिकाणी  नवीन दर निश्चित केले.  महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने  ११ जानेवारीला याबाबत विस्तृत आदेश जाहीर केला. तर ते आता लागू करणार आहेत. ३० मे २०११ रोजीच्या आदेशाने राज्यातील घरगुती, औद्योगिक व कृषी क्षेत्रातील पाणी वापरासाठीचे ठोक जलदर ठरवले होते.  रबी हंगाम २०१०-११ पासून म्हणजेच १५ आॅक्टोबर २०१० पासून लागू होते. महागाई निर्देशांकामध्ये ६३ टक्यांनी वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर नव्याने जलदर निश्चित करण्यात आलेत.
नव्या जलदरानुसार ग्रामपंचायतींसाठी प्रतिहजार लिटरमागे १३.२ पैशांवरून १५ पैसे, नगरपालिकांसाठी १५.८ पैशांवरून १८ पैसे, महापालिकांसाठी २१ पैशांवरून २५ पैसे इतकी दरवाढ करण्यात आली आहे.