नाशिक जिल्ह्यात वन्य प्राण्यांचे हल्ले सुरूच; 2 विविध घटनांत सुमारे 16 जण जखमी
नाशिक जिल्ह्यात सातत्याने वन्य प्राण्यांकडून होणारे हल्ले सुरू आहे. सिन्नर येथे वन्य प्राण्याने केलेल्या हल्ल्यामध्ये एक वयोवृद्ध महिला जखमी झाली आहे. तर नाशिक-नगर सीमेवर लांडग्याने केलेल्या हल्ल्यामध्ये सुमारे पंधरा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत वन विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर तालुक्यातील रामपूर पुतळेवाडी या भागामध्ये पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात वन्य प्राण्याने केलेल्या हल्ल्यामध्ये श्रीमती विठाबाई अर्जुन नरोडे या गंभीर जखमी झाल्या आहेत.
दुसरा हल्ला संध्याकाळी उशिरा नाशिक नगर सीमावर्ती भागामध्ये असलेल्या नागरी वस्तीमध्ये लांडग्याने हल्ला करून सुमारे 15 ते 16 जणांना जखमी केल्याची घटना घडली आहे. यामुळे प्राण्यांचे नागरी वस्तीवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ होत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.