मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (17:57 IST)

गरज पडल्यास मुख्यमंत्री, शरद पवार यांच्याशी चर्चा करणार : राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली, या भेटीत वाढील वीज बिल आणि दूध दरवाढ या दोन मुद्द्यावर प्रामुख्याने राज ठाकरेंनी राज्यपालांशी चर्चा केली. वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने जनतेला दिलासा द्यावा, याबाबत गरज पडल्यास मुख्यमंत्री, शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले.
 
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली, ट्रेन कधी सुरु होणार, रेस्टॉरंट उघडली आहेत, मंदिरं सुरु नाहीत, धरसोडपणा सोडून कधी काय होणार आहे ते सांगावं, लोकांना जिथे २ हजार बिल येत होतं तिथे १० हजार बिले येतंय, लोकांना वीजबिलाचा मोठा फटका बसतोय, राज्य सरकारला या विषयाशी कल्पना आहे. लवकरात लवकर या समस्येवर तोडगा निघावा, याबाबत लवकरच शरद पवार यांच्याशी बोलणार आहे, गरज पडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही भेटणार आहे असं त्यांनी सांगितले.
 
तसेच प्रश्न खूप आहेत, पण त्याबाबत काही तरी निर्णय घेणं गरजेचं आहे, एक दोन दिवसात या विषयावर निर्णय घ्यावा, पण सरकारचे आणि राज्यपालांचे एकूण सगळं बघता, तो निर्णय होईल का याबाबत साशंकता आहे.  वीजबिल कमी करू शकतो असं कंपन्यांचे म्हणणं आहे पण राज्य सरकारकडून यावर निर्णय होत नाही. राज्य सरकारने तात्काळ वीजबिलासंदर्भात निर्णय घ्यायला हवा. कोणतीही गोष्ट सांगितली तर त्यावर काम सुरु आहे असं उत्तर मिळतं पण निर्णय होत नाही, लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले, वीजबिल भरमसाठ येत आहेत, लोक बिल कुठून भरणार? बिल नाही भरलं तर वीज कापणार त्यामुळे सरकारने यावर लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.