सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (20:45 IST)

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दोन दिवसांत आटोपणार

कोरोनाच्या संकटामुळे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दोन दिवसांत आटोपण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर असे दोन दिवस चालणार आहे. तसेच हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे.
 
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे नियोजन करण्यासाठीची तयारी विधिमंडळ कामकाज समितीकडून सुरू होती. दरम्यान, विधिमंडळ कामकाज समिती बैठकीत अधिवेशनाबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार यावेळचे विधिमंडळाचे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईतच होणार आहे. तसेच हे अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर असे दोन दिवसच चालणार आहे.