शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 एप्रिल 2023 (17:07 IST)

शतपावली करत असलेली महिला दुचाकीच्या धडकेने ठार

Nashik Road दुचाकीच्या धडकेने रात्री शतपावली करण्यासाठी निघालेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुचाकी स्वराने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 
रात्रीच्या वेळीचा हा व्हिडीओ पाहणार्‍यांना धक्का बसत आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओत दिसून येत आहे की पादचारी महिलेला दुचाकी स्वाराने जोरदार धडक दिली. जेलरोडच्या पाण्याच्या टाकी कडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या बाईक स्वारने महिलेला जोरदार धडक दिली. 
 
या अपघातात महिलेच्या डोक्याला व छातीला जोरदार मार लागला. महिलेला उपचारासाठी नाशिक रोड येथील रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्यांना मृत घोषित केले गेले.