बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: यवतमाळ , सोमवार, 24 सप्टेंबर 2018 (15:22 IST)

यवतमाळमध्ये पोलीस अधिकऱ्यानी आरोपीवर केला गोळीबार

वर्चस्वाच्या लढाईत गुंड भय्या  यादव  वर आपसी वैमनस्यातून प्राणघातक हल्ला ; हल्ला करणाऱ्या देविदास चव्हाण पोलीस अधिकाऱ्याने झाडली गोळी. 
यवतमाळ शहराच्या लोहारा परिसरातील हॉटेल हॉलिडे इन या भागात एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करून त्याला जीवानिशी ठार मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीवर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने गोळी झाडून होणारी मोठी घटना टाळली आहे. लोहारा परिसरातील सराईत गुन्हेगार दीपक उर्फ भय्या यादव हा आपल्या गुन्हेगारी कारवायांमुळे लोहारा भागात वर्चस्व निर्माण करीत होता. या वर्चस्वाच्या लढाईत त्याचे लोहारा परिसरात अनेकांसोबत खटके उडत होते. यातच देविदास चव्हाण याच्या सोबत त्याचा वव्यावसायिक संघर्ष सुरु झाला. या संघर्षात या आधी देविदास चव्हाण याला भय्या यादव ने मारहाण सुद्धा केली होती अशी माहिती आहे.
 
याचाच वचपा काढण्यासाठी देविदास चव्हाण आपल्या साथीदारांच्या मदतीने भय्या यादवचा शेवट करण्याचे ठरवले आणि आज भय्या यादव देवीनगर भागातून शहरातील पोलीस मित्र सोसायटी कडे एकटा दुचाकी ने जात असल्याची माहिती  देविदास चव्हाणला मिळाली. त्यावरून देविदास चव्हाण ने लगेच आपले इंडिका वाहन घेऊन त्यात आपल्या ३ साथीदारांना सोबत घेतले आणि चेहऱ्याला गुलाल लावून हॉटेल हॉलिडे जवळ भय्या यादवला गाठले. आणि त्याच्यावर धारधार कोयत्याने वार केले.
त्याचवेळी त्याठिकाण वरून पोलिसांच्या टोळी विरोधी पथकाचे प्रमुख संतोष मनवर आपल्या
कर्मचारी संजय दुबे, अमोल चौधरी, गणेश देवतळे, विनोद राठोड यांच्या सह पेट्रोलिंग साठी जात होते. त्याना समोर कोणीतरी शस्त्राने वार करीत असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ आपले शासकीय वाहन थांबून हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला.
 
मात्र, हल्लेखोरांनी पोलीस अधिकरी संतोष मनवर यांच्यावरच हातातील शस्त्राने हल्ला केला. त्यात पोलीस अधिकारी संतोष मनवर हे थोडक्यात बचावून किरकोळ जखमी झाले. त्यानी त्याचवेळी आपल्या आत्मसंरक्षनासाठी आपल्या जवळील सर्व्हिस रिव्हॉल्वरने आरोपी वर एक राऊंड फायर केला. त्यात हल्लेखोर देविदास चव्हाणच्या छातीत गोळी लागली. लगेच पोलीस अधिकारी मनवर यांनी गोळीबारात जखमी झालेल्या देविदास चव्हाण आणि जखमी भैया यादव या दोघांना लगेच उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्या नंतर लगेच घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम राजकुमार लोहारा पोस्टे  ठाणेदार शीतल माल्टे, अवधूतवाडी चे दिनेश शुक्ला यांनी धाव घेतली होती शिवाय देविदास चव्हाण याचे तीन साथीदार पैकी घटनास्तळावरुन पोलिसांनी रामेश्वर रमेश राठोड राहणार साखर दिग्रस तसेच रामेश्वर पंजाबराव राठोड राहणार फुकट नगर वडगाव यवतमाळ यांना घटनास्तळ वरून तात्काळ ताब्यात घेतले तर घटनास्थळाहुन फरार झालेला आरोपी आकाश नेवारे याला वडगाव येथून अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मनोज लांडगे, पीएसआय मुडपे, कर्मचारी गौरव नागलकर, ऋतुराज मेडवे, सलमान शेख, यांनी ताब्यात घेतले आहे.
 
याप्रकरणी भैय्या यादवचे वडील यांच्या फिर्यादी वरून आरोपी देविदास चव्हाण, आकाश नेवारे, रामेश्वर राठोड यांच्याविरुद्ध ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
 
सध्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल आलेल्या जखमी दोघांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.
पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर यांच्या फिर्यादीवरून सुद्धा ३०७, ३५३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण घटनेने शहरात खळबळ उडाली असून दबंग पोलीस अधिकाऱ्याच्या या कारवाईने गुन्हेगाराचे धाबे दणाणले आहे.
 
संतोष मनवर यांनी याआधी सुद्धा आर्णी येथे अश्याच पद्धतीने खून प्रकरणातील आरोपीला पकडताना आरोपीने हल्ला केल्यावर आत्मसंरक्षणासाठी गोळी झाडली होती. त्यात आज अशीच घटना घडल्याने त्याच्याया धाडसाचे पोलीस वर्तुळात कौतूक होत आहे. असे असले तरी तरी त्याना वरिष्ठाना घटनेबाबत जवाब देताना नाकी नऊ येणार आहे.