रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जुलै 2020 (11:34 IST)

मंगळागौरीच्या व्रत-कैवल्यासह वाचा ही पौराणिक कहाणी

श्रावणाच्या महिन्यातील केले जाणारे देवी पार्वतीचे उपवास मंगळागौरीच्या नावाने प्रख्यात आहे. हे व्रत कैवल्य बायका आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी करतात. या उपवासाची कहाणी खालील प्रमाणे आहे -
 
कहाणी : एकदाची गोष्ट आहे, एका शहरात एक धर्मपाल नावाचा एक व्यवसायी राहायचा. त्याची बायको खूप सुंदर होती आणि त्यांच्या कडे खूप संपत्ती होती. पण त्यांना काहीही अपत्य नसल्यामुळे ते फार दुखी असायचे. देवाच्या कृपेने त्यांना एक मुलगा झाला पण तो ही अल्पायु होता. असे त्याला श्राप मिळाले असे की वयाच्या 16व्या वर्षात नाग दंशाने त्याची मृत्यू होईल. योगायोगाने त्याचे लग्न वयोवर्ष 16च्या आधी अश्या मुलीसोबत झाले की तिची आई देवी मंगळागौरीचे उपवास करायची.
 
परिणामी तिने आपल्या मुलीसाठी आनंदी आयुष्याचं आशीर्वाद मिळविला होता ज्यामुळे तिला कधीही वैधव्य मिळणार नव्हते. या कारणास्तव धर्मपालच्या मुलाने वयोवर्षे 100 पर्यंत आयुष्य मिळविलं. या कारणास्तव सर्व नवविवाहिता बायका या मंगळागौरीची पूजा करतात आणि गौरीचे उपवास करतात तसेच स्वतःसाठी एक दीर्घ, आनंदी आणि चिरस्थायी वैवाहिक जीवनाची मागणी मागतात. ज्या बायका उपवास करत नाही त्या किमान पूजा करतात.
 
ही कहाणी ऐकल्यावर सवाष्ण बाई आपल्या सासू किंवा नणंदेला किंवा सवाष्ण बाईला 16 लाडू देते. नंतर ती हाच प्रसाद ब्राह्मणाला देखील देते. ही सर्व विधी पूर्ण केल्यावर व्रती 16 वातीच्या दिव्याने देवीची आरती करते. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी देवी मंगळागौरीच्या मूर्तीला नदी किंवा पोखरात विसर्जित करतात. शेवटी देवी गौरीच्या सामोरं हात जोडून आपल्या सर्व केलेल्या गुन्हांसाठी आणि पूजेमध्ये झालेल्या चुकांसाठी क्षमा मागितली जाते. हे व्रत आणि पूजा आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी सलग 5 वर्षे करतात.
 
म्हणूनच शास्त्रानुसार या मंगळागौरीला नियमानुसार उपवास केल्याने प्रत्येक माणसाच्या वैवाहिक सुखात वाढ होऊन मुलं- नातवंडे देखील आपले आयुष्य आनंदाने घालवतात, अशी या मंगळागौरीच्या उपवासाचे वैभव आहेत.