शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: बुधवार, 22 जुलै 2020 (14:50 IST)

शनी प्रदोष व्रत : शनी प्रदोषाच्या उपवासाचे महत्त्व जाणून घेऊ या आणि हे 10 सोपे उपाय करून बघा ....

वर्षभरात दर महिन्यात दोन वेळा एकदा शुक्लपक्षात आणि दुसरं कृष्णपक्षात प्रदोषाचा उपवास केला जातो. हा उपवास द्वादशी/त्रयोदशीला करतात. जर कोणा भक्ताला भगवान शंकराला किंवा भोलेनाथाला प्रसन्न करावयाचे असल्यास त्याला प्रदोषाचा उपवास आवर्जून केला पाहिजे.
 
हा उपवास केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि व्रतीस सर्व सांसारिक सुखाची प्राप्ती मिळण्याचा तसेच पुत्र प्राप्तीचा वर देतात. त्याच बरोबर जर एखाद्या विशिष्ट दिवशी हा उपवास येतो तर त्या दिवसाशी निगडित देवांची उपासना करणं अत्यंत फायदेशीर असते. 
 
यंदाच्या वर्षी श्रावण महिन्यातील पहिला शनी प्रदोष उपवास 18 जुलै रोजी झाला तर दुसरा शनी प्रदोष उपवास 1 ऑगस्ट 2020 रोजी साजरा करण्यात येत आहे. म्हणून या दिवशी एखादी व्यक्ती पूर्ण भाव-भक्तीने शनिदेवाची उपासना केल्यास त्याचे सर्व त्रास आणि समस्या नक्कीच दूर होतात आणि शनीचा कोप, शनीची साडेसाती किंवा ढैयाचा प्रभाव कमी होऊन, ह्याचा अनुभव भक्त स्वतः घेऊन दुसऱ्याचे त्रास कमी करू शकतो. 
 
या उपवासात प्रदोष काळात आरती आणि पूजा केली जाते. संध्याकाळच्या सुमारास सायंकाळच्या वेळेस प्रदोषकाळ म्हटले जाते. असे मानले जाते की प्रदोष काळात शंकर साक्षात शिवलिंगावर अवतरतात म्हणून या वेळेस शंकराचे स्मरण करून त्यांची पूजा केल्याने चांगली फलप्राप्ति होते. 
 
याचा सह शनी प्रदोष असल्यामुळे शनी देवांची पूजा करणं देखील फायदेशीर असत. ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शनिदेवाला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय आहेत जे केल्याने शनिदेवाची शांतता केली जाते यामध्ये शनिप्रदोषच्या दिवसाचा जास्त महत्त्व आहे. जाणून घेऊ या की यासाठी  कोणते उपाय करायला पाहिजे - 
 
शनिप्रदोषाचे 10 सोपे चमत्कारिक उपाय :-
1 शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी शनी प्रदोष उपवास अतिशय फलदायक आहे. हे उपवास करणाऱ्यांना शनिदेवाची कृपा मिळते.
2 शनिप्रदोषाच्या निमित्ताने महादेवाचे भस्म आणि तिलाभिषेक करणं फायदेशीर असत.
3 या दिवशी दशरथकृत शनी स्तोत्राचे वाचन किंवा पठण केल्याने आयुष्यात येणारे कष्ट आणि समस्या आणि शनीच्या अशुभ प्रभावामुळे पडणारे दुष्प्रभाव कमी होतात. उपवासधारकांना या पाठाचे वाचन किमान 11 वेळा केले पाहिजे.
4 या व्यतिरिक्त शनी चालीसा, शनैश्चरस्तवराज:, शिवचालिसाचे वाचन आणि आरती केली पाहिजे.
5 शनी प्रदोषावर पार्थिव शिवलिंगाचे तेलाने अभिषेक करावे.
6 शनी प्रदोषावर महाकाळाचे दर्शन केल्यास विशेष पुण्य मिळते. म्हणून शक्य असल्यास या दिवशी महाकाळाचे दर्शन करावं.
7 शनी प्रदोषावर भगवान शंकराला साखरेचा नैवेद्य दाखवावे.
8 शनी प्रदोष उपवास शनीच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी चांगला असतो. याचा उपवास करणाऱ्यांनी शनी प्रदोषाच्या दिवशी सकाळच्या वेळेस भगवान शंकराची पूजा केली पाहिजे, आणि नंतर शनिदेवाची पूजा करावी.
9 या शिवाय दूध, दही, तूप, नर्मदा व गंगाजल, मध याने अभिषेक करावे. श्रावण महिन्यात या निमित्ताने शिवलिंग बांधण्यात येत.
10 या दिवशी शिव चालीसा, प्रदोष स्तोत्र, कथा, शंकराची आरती आणि मंत्राचा जप केल्याने शनीच्या संबंधित दोषांपासून सुटका मिळते.