गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019 (15:23 IST)

पी. व्ही. सिंधू, समीरचे आव्हान संपुष्टात

ओडेन्से: भारताची ऑलिंपिकपदक विजेती अव्वल खेळाडू पी. व्ही. सिंधूचे डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान दुसऱ्या फेरीच्या सामन्यातील पराभवाने संपुष्टात आले.
 
कोरियाच्या आन से युंगने सिंधूचा 21-14, 21-17 असा पराभव करत तिसरी फेरी गाठली. बुधवारी भारताची आणखी एक अव्वल खेळाडू साईना नेहवालला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता.
 
आता सिंधूला देखील अपयश आल्याने भारताला या स्पर्धेत आता पदकाची आशा राहिलेली नाही. सिंधूला यंदाच्या मोसमात चीन, कोरिया आणि आता या स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अपयशाचा सामना करावा लागला आहे.
 
भारताचा नवोदित खेळाडू समीर वर्मा यालादेखील चीनचा ऑलिंपिकपदक विजेता चेन लॉंग याच्याकडून 21-12, 21-10 असा पराभव पत्करावा लागला.