1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 30 ऑगस्ट 2018 (08:42 IST)

भारताचा महिला हॉकी संघ फायनलमध्ये

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला हॉकी संघाने इतिहास घडवला आहे. उपांत्यफेरीच्या सामन्यात तीन वेळचा विजेता चीनचा 1-0 असा पराभव करत भारताने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. तब्बल 20 वर्षानंतर भारताचा महिला संघ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला असून यापूर्वी अशी कामगिरी 1998 ला बँकॉकमध्ये झालेल्या स्पर्धेत नोंदवण्यात आली होती. सामन्यातील एकमात्र विजयी गोल हिंदुस्थानच्या गुरजीत कौर हिने 52 व्या मिनिटाला केला. 
 
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीचा समावेश 1982 ला करण्यात आला होता आणि त्याच वेळी भारताने आपले पहिले सुवर्णपदक जिंकले होते. परंतु त्यानंतर सुवर्णपदकाने नेहमीच हुलकावणी दिली आहे.