शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (12:23 IST)

लिओनेल मेस्सीने बोलिव्हियाविरुद्ध हॅटट्रिक केली, महान पेलेला मागे टाकले

अर्जेंटिनाच्या महान खेळाडूंपैकी एक, लिओनेल मेस्सीने महान पेलेला मागे टाकत शुक्रवारी बोलिव्हियाविरुद्ध फिफा विश्वचषक पात्रता सामन्यात हॅटट्रिक केली. या हॅट्ट्रिकमुळे आता दक्षिण अमेरिकेने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम मेस्सीच्या नावावर झाला आहे.आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 79 गोल करण्याचा विक्रम मेस्सीच्या नावावर आहे.त्याने एकाच सामन्यात ब्राझीलचा महान पेलेचे 77 आणि इराकचा हुसैन सईदचे 78 गोलचे विक्रम मोडले.

बोलिव्हियाविरुद्धच्या क्वालिफायर सामन्यात मेस्सीने 14 व्या मिनिटाला पहिला गोल केला.यानंतर,त्याने आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली आणि 64 व्या आणि 88 व्या मिनिटाला हॅटट्रिक करत संघाला मोठा विजय मिळवून दिला. ब्यूनस आयर्स येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात बोलिव्हिया संघ एकही गोल करण्यात यशस्वी होऊ शकला नाही.या विजयासह अर्जेंटिनाचे आता 18 गुण झाले असून तो दुसऱ्या स्थानावर आहे. बोलिव्हिया सहा गुणांसह नवव्या स्थानावर कायम आहे.
 
या तीन गोलसह, मेस्सी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीच्या शीर्षस्थानी पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो आहे, ज्याने आपल्या संघासाठी 111 गोल केले आहेत. त्याच्या पाठोपाठ अली देई 109, मोख्तार डहारी 89, फेरेन्क पुस्कस 84, गॉडफ्रे चितलू 79 गोल आहेत.