बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2021-22
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (13:20 IST)

Corona vaccination: अर्थसंकल्पात मोठी घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत २०२१-२२ वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राकडे सर्वांचे लक्ष होते कारण कोरोना काळाची झळ बसलेल्यांना करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सरकार किती रक्कमेची तरतूद करणार याकडे लक्ष लागले होते. अर्थमंत्री सीतारामन यांनी करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपये जाहीर केले आहेत.
 
सध्या भारतात पहिल्या टप्प्याचे लसीकरण सुरु असून सर्वात धोकादायक गटातील आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. या लसीकरणाचा खर्च केंद्राने उचलला आहे. देशाची बिघडलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी करोना प्रतिबंधक लसीकरण आवश्यक आहे. अशात पहिल्या फेजनंतर उर्वरित फेजचा सर्व खर्च केंद्रच करणार का याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले होते. करोना व्हायरसचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले. 
 
भारतात सध्या सीरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसी उपलब्ध आहेत. पण करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुढच्या काही दिवसात आणखी दोन करोना प्रतिबंधक लसी उपलब्ध होतील, असं त्याला म्हणाल्या.
 
बजेट दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ या नव्या योजनेची घोषणा करत यासाठी पुढील सहा वर्षांसाठी ६४,१८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं सांगितलं.