Post Office च्या या 3 योजना, सर्व बँकांच्या व्याजावर भारी
कोणाला आपल्या पैशावर जास्तीत जास्त व्याज मिळेल अशी इच्छा नसते, परंतु फक्त व्याज मिळवणे पुरेसे नाही. गुंतवणूक करताना आपणास करात सूट मिळण्यासह अधिक फायदे मिळत आहेत हे देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे. हे देखील पाहावं लागतं की जेथे सेव्हिंग करत आहात तेथे व्याज दर काय आहे, त्याचा लॉक-इन पीरियड काय आहे. तर जाणून घ्या शानदार व्याज देणार्या या 3 पोस्ट ऑफिस सेविंग्स स्कीम्सबद्दल-
तसं तर पोस्ट ऑफिसच्या सर्व सेविंग्स स्कीम बँक डिपॉजिटहून अधिक व्याज ऑफर करतात परंतु काही स्कीम अशा देखील आहेत ज्यात टॅक्स बेनेफिट्समुळे विशेष लाभ मिळतो. आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत करात सूट मिळते. अर्थात दुसर्या शब्दात पोस्ट ऑफिस योजना बँकेपेक्षा बरेच चांगले असल्याचे सिद्ध होते. चला आज जाणून घ्या पोस्ट ऑफिसच्या अशा तीन खास योजनांबद्दल, ज्या बँकांपेक्षा जास्त व्याज देतात.
1- Post office time deposit
जर तुम्हाला 5 वर्षे पैसे गुंतवणूक करायची असेल आणि चांगल्या रिर्टनची आस असेल तर पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. बँकांकडून पाच वर्षाच्या डिपॉजिटवर सुमारे 5.5 टक्के व्याज दर दिलं जातं परंतु पोस्ट ऑफिसमध्ये आपल्याला 6.8 टक्के व्याज मिळू शकतं. छोट्या गुंतवणूकीसाठी 1.3% जास्त व्याज मिळत असल्याचं जास्त फरक पडत नसला तरी मोठी रक्कमची गुंतवणूक असल्यास 1.3% अधिक व्याज म्हणजे खूप फरक पडू शकेल.
2- National Savings Certificate
नेशनल सेविंग्स सर्टिफिकेट अर्थात एनएससीवर आपल्याला 6.8 टक्के व्याज मिळतो. तथापि, त्याचा लॉक-इन पीरियड 5 वर्ष आहे. त्यात जर आपण 1000 रुपयांची गुंतवणूक करत असाल तर ते 1389.49 रुपये होतील. तथापि, येथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे त्यातून मिळणारे व्याजदेखील आकारले जाते. म्हणजे
यामध्ये आपल्याला अधिक व्याज मिळेल, परंतु त्या व्याजवरील कराचा लाभ आपल्याला मिळणार नाही.
3- Public provident fund
पब्लिक प्रोविडेंट फंड अर्थात पीपीएफला पोस्ट ऑफिस स्कीम म्हणणे पूर्णपणे योग्य नाही कारण बँक देखील हे अकाउंट उघडतात. तथापि आपण पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणुकीचा पोर्टफोलियो तयार करत असाल तर त्यात पीपीएफला अवश्य सामील करा. पीपीएफ अकाउंटमध्ये 7.1 टक्के व्याज मिळतं, जे टाइम डिपॉजिट आणि एनएससी दोन्हीपेक्षा अधिक आहे. तथापि, त्याची सर्वात मोठी कमतरता म्हणजे त्याचा लॉक-इन कालावधी 15 वर्ष इतका आहे. तर सर्वात फायद्याची बाब म्हणजे यावर मिळणारे व्याज करमुक्त आहे. दुसरीकडे, आपण 5 वर्षांपूर्वी पीपीएफ तोडल्यास, आपल्याला शुल्क देखील द्यावे लागेल, व्याजावरील कर वेगळा असेल. म्हणून जर तुम्हाला 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर पीपीएफबद्दल अजिबात विचार करू नका, अन्यथा तोटा होईल.