शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. योग
  4. »
  5. योग सल्ला
Written By वेबदुनिया|

कमरेच्या दुखण्यावर योग उपयुक्त

WD
भारताची प्राचीन परंपरा असलेला योग आजही अनेक रोगांवर उपाय आहे. योगासन व प्राणायामाद्वारे कमरेचे दुखणे बरे करू शकतो, असा दावा यामुळेच करण्यात येतो.

आता कंबर दुखण्यावर उपचार करण्यासाठी योग कसा उपयोगी ठरतो, हे पाहण्यासाठी एक प्रशिक्षण सत्र होणार आहे. त्यासाठी योग शिक्षकांचे एक पथक बारा आठवड्यांचा एक प्रशिक्षण कोर्स सुरू करत आहे.

या प्रशिक्षणात योगाच्या अनेक प्रकारांचा समावेश केला गेला आह. यात 18 महिन्यांपासून कंबर दुखणे सहन करणाऱ्या 18 ते 65 वयोगटातील 260 जणांना तपासले जाईल.

न्यूयाँर्क क्लीनिकल ट्रायल्स विद्यापीठाचे संचालक डेविड टोर्गेरसन यांच्या नेतृत्वाखाली या रूग्णांची तपासणी करण्यात येईल. त्याद्वारे कमरेच्या दुखण्यावर योग किती उपयुक्त ठरतो, हे पाहिले जाईल.