शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (12:50 IST)

कपालभाती प्राणायाम मुळे हार्ट ब्लॉकेज होत नाही,10 चमत्कारिक फायदे जाणून घ्या

कपालभाती प्राणायामला हठयोगात समाविष्ट केलं आहे. प्राणायामांमध्ये हा सर्वात प्रभावी प्राणायाम मानला जातो. ही एक जलद केली जाणारी रेचक प्रक्रिया आहे. मेंदूच्या पुढच्या भागाला कपाल म्हणतात आणि भाती म्हणजे प्रकाश किंवा ज्योत .
 
चेतावणी: कपालभाती प्राणायाम योग शिक्षकांकडून शिकल्यानंतरच करावा, कारण हा प्राणायाम शरीरात रक्त परिसंचरण आणि उष्णता वेगाने वाढवतो.हे केल्याने सुरुवातीला चक्कर येते आणि डोळ्यांसमोर अंधारी येते. हे प्राणायाम मनाने करू नका.कपालभाती प्राणायाम थेट करत नाही. हे प्राणायाम प्रथम अनुलोम-विलोमचा सराव केल्यानंतरच करतात.
 
1. विशिष्ट कालावधीसाठी योग्य पद्धतीने हा प्राणायाम केल्याने हृदयामध्ये कधीच अडथळे किंवा ब्लॉकेज निर्माण होत नाहीत किंवा रक्त साकळत नाही. जर एखाद्याला हृदयात अडथळ्याची समस्या असेल, तर आपण हे एकाद्या योगगुरूंच्या मार्गदर्शनाखाली केले तर हृदयाचे ब्लॉकेज उघडण्यास सुरुवात होईल. तज्ञांचा असा विश्वास आहे की हे  केल्याने हृदयाचे अवरोध किंवा ब्लॉकेज 15 दिवसात उघडतात.
 
2. वेळोवेळी हा प्राणायाम केल्याने हृदय कधीही अचानक काम करणे थांबवत नाही.असे आढळून आले आहे की अनेक लोक अचानक कार्डियक फेल्युअरमुळे मरण पावतात.
 
3. कपालभाती प्राणायाम केल्याने वाढलेले कोलेस्टेरॉल हळूहळू कमी होऊ लागते. रुग्णाला कोणत्याही प्रकारचे औषध घ्यावे लागत नाही.
 
4. या प्राणायाम केलेल्याने फुफ्फुसे मजबूत होतात आणि फुफ्फुसांची काम करण्याची क्षमता वाढते. कोरोना काळात ही सर्वात प्रभावी कामगिरी ठरली आहे.
 
5. डोळ्यांखालील सुरकुत्या आणि गडद मंडळे दूर करून हा प्राणायाम चेहऱ्याची चमक वाढवतो.
 
6. हे शरीरातील चरबी कमी करते.या मुळे लठ्ठपणा आणि वजन देखील कमी होते.
 
7. बद्धकोष्ठता,गॅस,अॅसिडिटीच्या समस्येमध्ये हे फायदेशीर आहे.कपालभाती केल्याने पचनशक्ती विकसित होते. यामुळे लहान आतडे मजबूत होतात.
 
8. दात आणि केसांचे सर्व प्रकारचे आजार बरे होतात.
 
9. हा प्राणायाम केल्याने मायग्रेनचा त्रास ही दूर होतो.
 
10. हे प्राणायाम शारीरिक आणि मानसिक बळ देतो.या मुळे आत्मविश्वास वाढतो आणि निराशा दूर होते. शरीर आणि मनाचे सर्व प्रकारचे नकारात्मक घटक आणि विचार नाहीसे होतात. ताण देखील नाहीसा होतो.
 
टीप: काही डॉक्टरांचा असा विश्वास आहे की या प्राणायामामुळे थायरॉईड, रक्तातील कमी प्लेटलेट्स, वाढलेले किंवा कमी झालेले यूरिक ऍसिड,क्रिएटिनिन,अतिरिक्त हार्मोन्सची गळती, हिमोग्लोबिनची कमतरता, त्वचेच्या रोगात देखील फायदा होतो.
 
कृती: सिद्धासन, पद्मासन किंवा वज्रासन मध्ये बसून श्वास सोडण्याची क्रिया करा. श्वास सोडताना किंवा बाहेर काढताना, पोट आतल्या बाजूला ढकलून द्या.लक्षात ठेवा की श्वास घ्यायचा नही कारण वरील कृतीमध्ये श्वास आपोआप आत जातो.