शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 1 मार्च 2021 (19:22 IST)

दैनंदिनी जीवनात योगासनाचे फायदे जाणून घ्या

वजन कमी करणे, मजबूत आणि लवचिक शरीर, सुंदर चमकणारी त्वचा, शांत मन, चांगले आरोग्य योग हे सर्व देते. योगाचे शरीराला मिळणारे फायदे जाणून घेऊ या. 
 
1 संपूर्ण आरोग्य - जेव्हा आपण संपूर्ण निरोगी असता त्यावेळी शारीरिकच नव्हे तर मानसिकरित्या देखील निरोगी असता. नियमित पणे योगा केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य मिळते.  
 
2 वजन कमी होत- सूर्य नमस्कार आणि कपालभाती सारखे योग शरीराचे वजन कमी करते. या व्यतिरिक्त नियमित पणे योग केल्याने शरीरात ऊर्जेचा संचार होतो आणि आपल्या आहारात काय समावेश करावे आणि काय नाही हे समजते. या मुळे वजन वाढत नाही.
 
3 चिंता मुक्ती- दिवसभर काही मिनिटांचा योग सर्व चिंता दूर करतो. शारीरिक आणि मानसिक चिंता दूर करण्यासाठी योग करावे. या साठी प्राणायाम आणि ध्यान हे योगासन प्रभावी आहे. हे शरीराला तणाव आणि हानिकारक पदार्थांपासून मुक्त करते.
 
 4 आत्मिक शांती- सर्वांना शांततेचे आणि नैसर्गिक ठिकाण आवडते. शांती आपण मनात अनुभवू शकतो. योगा आणि ध्यान केल्याने आत्मिक शांती मिळते. 
 
5 प्रतिरोधक क्षमतेत सुधारणा-आपण शरीर आणि आत्माने एकत्रपणे बनलेले आहोत. शरीरावर कोणत्याही  अनियमततेचा परिणाम होतो. मनातील निराशा आणि थकवा हे शरीरात रोगाचे कारण आहे. योगासन अंगांना सामान्य स्थितीत ठेवतात आणि स्नायूंना सामर्थ्य देतात. प्राणायाम आणि चिंतन तणाव कमी करते आणि रोग प्रतिकारक शक्ती सुधारते.
 
6  अधिक जागृत राहा- मन हे भूत आणि भविष्याच्या मध्ये भरकटते परंतु वर्तमानाचा विचार करत नाही. मनाची जागृत अवस्था तणावातून मुक्त करते. मनाला शांती देऊन कार्य क्षमता वाढवते.योग आणि प्राणायाम वर्तमानावर लक्ष केंद्रित करतात या मुळे आपण लक्ष्यावर केंद्रित होतो.   
 
7 नाती सुधारते- योगामुळे मन आनंदी होत आणि शरीर निरोगी, काळजी मुक्त राहते या मुळे नातेवाईकांशी संबंध सुधारतात. 
 
8 ऊर्जा वाढते- दिवसाच्या शेवटी थकलेलं वाटते. दिवसभराच्या कामापासून थकवा जाणवतो तर काही मिनटे योगासनं केल्यानं ताजेपणा आणि भरपूर ऊर्जा देतात.
 
9  शारीरिक लवचिकपणा आणि बसण्याची पद्धत- आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावयाचा आहे या मुळे कोमलता, सामर्थ्य आणि लवचिकता मिळेल. योगासन केल्याने शरीर दृढ होते आणि स्नायू बळकट होतात.हे चुकीच्या उठण्याच्या बसण्याच्या पद्धतीमध्ये सुधार आणते.शारीरिक वेदना देखील दूर करते. 
 
10 चांगले अंतर्ज्ञान -योग आणि ध्यान केल्याने अंतर्ज्ञानाची शक्ती सुधारते. या मुळे हे कळते की काय कधी कसे करावे. जेणे करून सकारात्मक परिणाम मिळतील. नियमितपणे योगाचा सराव केल्याने फायदे मिळतात.