बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020 (11:38 IST)

महिलांसाठी योगाचे महत्व जास्त, स्त्रीरोगावर विशेष प्रभावी

योग हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. या मुळे शरीरास बळ मिळत आणि मानसिक एकाग्रतेस मदत करतं. जर आपण आपल्या जीवनशैलीत योगाचा समावेश केला तर ते उच्च रक्तदाब, हृदयरोग, फुफ्फुसाचा रोग बरं करत आणि पचन संस्था मजबूत करतं. योगाने निद्रानाश होत आणि उदासीनता देखील दूर करतं. 
 
महिला मधील होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी, हार्मोनल तक्रारी, स्तनाचा कर्करोग सारख्या समस्यांमध्ये आराम मिळवण्यासाठी योग एक महत्त्वाची भूमिका बजावतं. यासाठी महिलांनी आपल्या दैनंदिनीमध्ये योगाचा समावेश करणं आवश्यक आहे. चला तर मग याचे फायदे जाणून घेऊ या. 
 
स्त्रियांच्या हार्मोनल समस्या पासून बचाव - 
स्त्रियांमध्ये हार्मोन्सच्या बदलमुळे होणाऱ्या समस्या सामान्य आहेत, परंतु त्यांना सहज घेणं देखील चांगले नाही. मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास जसे अनियमित पाळीचक्र, पोटात मुरडा येणं, शरीरातील ऊर्जाच्या समस्येला दूर करण्यात योग मदत करतं. मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांच्या शरीरात होणाऱ्या बदलपासून योगा आराम मिळवून देतो. नियमितपणे योगाचा सराव केल्यानं निद्रानाश, काळजी, नैराश्य, आणि बदलणाऱ्या मूड पासून आराम मिळतो.
 
वजन कमी करण्यात मदत करतं - 
योगाच्या साहाय्याने वजन देखील कमी करता येतं. नियमित योगा केल्यानं स्नायू बळकट होतात. हे आपल्या शरीराचा बांधा योग्य ठेवतं ज्यामुळे आपल्यातली आत्मविश्वासाची पातळी देखील चांगली राहते. लोकांवरील केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहेत की जे लोक आठवड्यातून एकदाच योगा करतात त्यांमध्ये चार वर्षात वजन वाढण्याची समस्या त्या लोकांपेक्षा कमी आहे जे कधीही किंवा फारच कमी योगा करतात.
 
औदासिन्यता आणि तणावापासून मुक्ती - 
एका संशोधनानुसार पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त नैराश्य आणि तणाव दिसून आले आहे. असे देखील दिसून आले आहेत की योगा केल्याने मेंदूत चांगल्या रसायनाचा स्त्राव होतो. ज्यामुळे मेंदूला तणाव आणि नैराश्यातून आराम मिळतो. योगा केल्यानं श्वसनाचा त्रास होत नाही.
 
संशोधनामध्ये असे आढळून आले आहेत की सतत योगासनांचा सराव केल्याने महिलांना स्तनाच्या कर्करोगाशी लढण्यात मदत मिळते.