बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शनिवार, 29 जानेवारी 2022 (13:57 IST)

मध्यरात्री झोप उघडते ? चांगली झोप येण्यासाठी रोज झोपण्यापूर्वी ही योगासने करा

रात्री झोपल्यानंतर सरळ सकाळी डोळे उघडले तर फ्रेश वाटते. पण मधेच झोप उघडली  तर पुढचा संपूर्ण दिवस खराब होतो. रात्री वारंवार झोप उघडण्याची अनेक कारणे असू शकतात. काही लोक असे आहेत जे पोटावर झोपतात, तर अनेकजण त्यांच्या पाठीवर, डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला झोपणे पसंत करतात. जर आपल्यालाही चांगली झोप घ्यायची असेल, तर आरामदायी स्थितीत झोपणे महत्त्वाचे आहे जे आपल्या झोपेच्या चक्राला व्यवस्थित करण्यास मदत करते आणि शरीराला आरामशीर स्थितीत ठेवते. शांत झोप येण्यासाठी या योगासनांची मदत घेऊ शकता
 
पृथ्वी मुद्रा- चांगल्या झोपेसाठी, आपण झोपण्यापूर्वी बेडवर बसून हे आसन करू शकता. हे करण्यासाठी, पद्मासन सारख्या ध्यानाच्या मुद्रेत बसा आणि पाठ ताठ ठेवा. अंगठ्याच्या टिपा आणि अनामिका एकमेकांना हळूवारपणे स्पर्श करू द्या. आपल्या उर्वरित बोटांना सरळ करा. हे दोन्ही हातांनी करा आणि तळव्याचा मागचा भाग गुडघ्यावर ठेवा. आपले डोळे बंद करा आणि आपले लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा.
 
ब्रह्मरी प्राणायाम - या आसनाचा सराव सकाळी आणि झोपण्यापूर्वी एकदा तरी करू शकता. या साठी पाठीवर झोपा. आपले हात पसरवा. तळवे वरच्या दिशेला ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि आपल्या फुफ्फुसांना हवेने भरा. श्वास सोडताना, आपल्या घशातून मधमाशी गुंजत असल्याचा आवाज करा. याला बी ब्रीथ असेही म्हणतात. 
 
वरुण मुद्रा - हे करण्यासाठी, अर्ध्या बसण्याच्या स्थितीत बसा. कोणत्याही मुद्रा व्यायामाची पहिली अट म्हणजे विश्रांती घेणे. हा व्यायाम करण्यासाठी, बेडवर आरामदायी स्थितीत बसा. अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी डोळे बंद करू शकता. अंगठा आणि करंगळी एकत्र जोडून ध्यान केंद्रित करा.