संबंधित माहिती
- अनंत चतुर्दशी 2020 : गणेश विसर्जनाशिवाय भगवान अनंताची उपासना करण्याचा दिवस जाणून घेऊ या थोडक्यात माहिती..
- कोरोना काळात गणेशाचे विसर्जन कसं करावं, सोपी प्रामाणिक पद्धत जाणून घेऊ या...
- बाप्पा घरी आले, अवघे घर देऊळ झाले
- आपणांस गणेशाच्या स्त्री स्वरूपाची माहिती आहे का? जाणून घ्या..
- श्रीगणेश चतुर्थी 2020 : 10 दिवसात गणेशाच्या या 11 उपायांपैकी कोणते ही 1 उपाय करा..
श्री महागणपती
अष्टविनायकातील सर्वांत शेवटचा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो. त्रिपूरासुर राक्षसाचा वध करण्यापूर्वी शंकराने गणपतीची येथे पूजा केली होती. हे मंदिर शंकराने बांधले असून त्याने उभारलेल्या गावाला मणिपूर असे नाव दिले. आता हे गाव रांजणगाव म्हणून ओळखले जाते. येथील मूर्तीचे तोंड पूर्वेकडे असून त्याचे कपाळ मोठे आहे.
येथील मूळ मूर्ती सध्याच्या मूर्तीच्या मागे असल्याचे सांगितले जाते. या मूर्तीला 10 सोंड व 20 हात होते. तिला मोहोत्कट असे म्हटले जाते.
या मंदिराचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडती, अशी मंदिराची रचना आहे. या मंदिराचे बांधकाम नवव्या व दहाव्या शतकातील आहे. श्रीमंत माधवराव पेशवे नेहमी या मंदिराला भेट द्यायला यायचे.
त्यांनीच या मूर्तीसाठी तळघर बांधले. रिध्दी व सिध्दी या दोघी मूर्तीच्या बाजूला आहेत. दरवाजापाशी जय व विजय हे दोघे रक्षक आहेत. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी व त्या दिवशी या ठिकाणी मुक्त प्रवेश असतो.
जाण्याचा मार्ग :
पुणे नगर रस्त्यावर व पुण्याहून 50 किलोमीटरवर रांजणगाव येथे हे देऊळ आहे.