शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (17:32 IST)

अजित पवार - ‘आमदारांच्या गाडी करता जे करायचं ते फाईलवर करतो, सगळ्या महाराष्ट्राला कळायला नको

राज्यातली ई- निविदा प्रणालीची मर्यादा 3 लाखांवरून आता 10 लाख करण्यात आली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे.
विधानसभेत ही घोषणा करताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणला. 'लोकशाहीत जरा इतरांचंसुद्धा ऐकावं लागतं,' असा टोला हाणत अजित पवारांनी ई-निविदा प्रणालीची मर्यादा वाढवली.
 
अधिनेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलताना अजित पवार यांनी आणखीसुद्धा काही घोषणा केल्या.
 
त्यात 1 मार्चपासून आमदारांचं वेतन पूर्ववत होणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. शिवाय आता आमदारांचा निधी आता 4 कोटी करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
 
तसंच चर्नीरोडला मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे. शिवाय ठाणे शहरात हॉस्पिटल उभारण्यासाठी 50 कोटींची तरतूद अजित पवार यांनी जाहीर केला आहे.
 
14 एप्रिल 2024 पर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक तयार होईल. निधीची कोणतीही कमतरता असणार नाही, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
 
यावेळी आमदारांच्या गाडीसाठी पण काही निधी देऊन टाका दादा असं भास्कर जाधव म्हणाले. त्यावर आमदारांच्या गाडी करता जे करायचं ते फाईलवर करतो, सगळ्या महाराष्ट्राला कळायला नको, असं अजित पवार म्हणाले.