सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 (11:04 IST)

एका सोशल पोस्टसाठी सेलिब्रिटी किती रुपये कमवतात?

जेन वेकफिल्ड
एका अहवालानुसार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचं उत्पन्न गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढलेलं आहे.
 
सोशल मीडियावर अतिशय लोकप्रिय असणाऱ्या, वस्तू वा उत्पादनांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जाहिरात करणाऱ्यांना कन्टेन्ट क्रिएटर्सना 'इन्फ्लुएन्सर' म्हणतात.
 
इन्स्टाग्रामवर एक 'स्पॉन्सर्ड' फोटो पोस्ट करण्यासाठीची सरासरी किंमत 2014 मध्ये 134 डॉलर्स होती. ती आता 2019मध्ये तब्बल 1642 झाल्याचं मार्केटिंग कंपनी आयझियाने म्हटलंय.
 
स्पॉन्सर्ड पोस्ट्स, व्हिडिओज, स्टोरीज आणि ब्लॉग्ससाठी सढळहस्ते पैसे देण्याची ब्रॅण्ड्सची तयारी असते, असं बिझनेस इनसायडरने म्हटलंय.
 
पण याचा अर्थ पारंपरिक पद्धतीने जाहिरात करणं मागे पडलंय असा हो नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
 
"डिजिटल मार्केटिंग हा सध्या परवलीचा शब्द झाला असला तरी जाहिरात हे नेहमीच पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धतींनी केली जाईल," सोशलबेकर्स या सोशल मीडिया मार्केटिंग कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह युवाल बेन इट्झाक म्हणतात.
 
2014 ते 2019 या काळातील फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम आणि ब्लॉग्सवरील स्पॉन्सर्ड मजकूर पाहून आणि त्यासाठी आकारण्यात आलेल्या दरांचा अभ्यास करत हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
 
ज्यांना 1 लाखांपेक्षा कमी फॉलोअर्स आहेत, त्यांना 'मायक्रो इन्फ्लुएन्सर' म्हटलं जातं. अशा मायक्रो इन्फ्लुएन्सर्सपासून ते प्रसिद्ध व्यक्तींपर्यंतचे सगळेच या माध्यमातून चांगली कमाई करत आहेत.
 
या पाहणीत आढळलेल्या गोष्टी
2018 ते 2019 या वर्षभरातच इन्स्टाग्रामवरील स्पॉन्सर्ड फोटोचा दर 44%नी वाढलेला आहे.
स्पॉन्सर्ड ब्लॉगसाठीचा दर 2006मध्ये 7.39 डॉलर्स (529 रुपये) होता. त्यावरून 2019मध्ये हा दर 1,442 डॉलर्स ( 1 लाख 3 हजार अंदाजे ) झालाय.
सगळ्यांत जास्त पैसे मिळतात युट्यूबसाठी. युट्यूबवरच्या स्पॉन्सर्ड कन्टेन्टसाठी चौपट पैसे मिळत आहेत. एका युट्यूब व्हिडिओसाठी 6700 डॉलर्स (4.8 लाख रुपये अंदाजे) मिळतात.
2014मध्ये एका फेसबुक स्टेटस अपडेटची किंमत होती 8 डॉलर्स होती. आता ती 395 डॉलर्स झालीय.
ट्विटर पोस्टची किंमत 2014 च्या 29 डॉलर्सवरून 422 डॉलर्स (30,256 रुपये ) झाली आहे.
ब्लॉग पोस्टसाठीचा दर आहे 1442 डॉलर्स (
ग्राहक कायद्याचा बडगा
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची संख्या जशी वाढतेय तशी आता याकडे आता अमेरिकन प्रशासनाची नजर वळायला लागलेली आहे.
 
गेल्या महिन्यात 3 इन्फ्लुएन्सर्सनी बंदी असलेल्या डाएट उत्पादनांविषयी पोस्ट केल्यानंतर या तिघांवर बेजबाबदार असल्याची टीका करण्यात आली होती.
 
आपण करत असलेली पोस्ट ही उत्पादनांची जाहिरात असल्याचं स्पष्ट न केल्यास तो ग्राहक कायद्याचा भंग मानला जाईल असं या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या 'कॉम्पिटिशन अॅण्ड स्टॅण्डर्डस अथॉरिटी'ने म्हटलं होतं.
 
यानंतर ज्या 16 इन्फ्लुएन्सर्सनी आपल्या कामाच्या पद्धतीत बदल करण्याचं ठरवलं त्यात झोई सग (झोएला) (Zoella), गायिका रिटा ओरा आणि मॉडेल रोझी हंटिंग्टन-व्हिटले यांचा समावेश होता.
 
सोशलबेकर्सच्या डेटानुसार सोशल मीडियावर जाहिरात करण्यासाठी ब्रॅण्ड्स अजूनही पैसे ओतत आहेत.
 
गेल्या वर्षभरामध्ये इन्फ्लुएनर्ससी स्पॉन्सर्ड पोस्ट करण्याचं प्रमाण 150% वाढलंय तर ad हा हॅशटॅग वापरला जाण्याचं प्रमाण दुप्पटीपेक्षा जास्त झालंय.
 
2020मध्ये ब्रँण्डस या इन्फ्लुएन्सर मार्केटिंगवरचा खर्च वाढवतील आणि त्यामुळे ही एक 10 अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेली इंडस्ट्री होईल असा अंदाज आहे.
 
सध्या इन्स्टाग्राम एखाद्या पोस्टला किती 'लाईक्स' मिळाले आहेत हे दाखवणारा आकडा दाखवणं बंद करण्याच्या विचारात आहे. पण याचा या इन्फ्लुएन्सर इंडस्ट्रीवर परिणाम होणार नसल्याचं बेन इट्झाक यांना वाटतं.
 
"आपल्या पोस्टना प्रतिसाद देणारे लोक कोण आहेत हे इन्फ्लुएन्सर्सना पाहता येईल. आणि हे पाहता यावं यासाठी ब्रॅण्डसनाही अशी परवानगी देणं ही नेहमीची बाब आहे," ते म्हणतात.
 
"खरा प्रश्न हा आहे की लाईक्स दिसले नाहीत तर मग ग्राहक तितके त्या पोस्टला प्रतिसाद देतील का"