रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 14 डिसेंबर 2020 (17:10 IST)

मराठा आंदोलकांना मुंबईत प्रवेशबंदी

मराठी क्रांती मोर्चाच्या आंदोलकांना मुंबईत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मुंबईच्या वेशीवर नाकाबंदी करून आंदोलकांना रोखलं जात आहे. सोमवारी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात आहे.
 
या प्रवेशबंदीमुळे मुंबईच्या वेशीवर वाहतूक कोंडी झाली आहे. मराठा आंदोलन लहान स्वरुपात व्हावं यासाठी खबरदारी म्हणून ही प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईकरांचं दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात येत आहे.  
 
मराठा क्रांती मोर्चाकडून कोल्हापूर ते मुंबईपर्यंत रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी या रॅलीला सुरुवात होईल.
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्याच्या राज्य सरकारच्या अर्जावर पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. आरक्षणविषयक पुढील सुनावणी 25 जानेवारीला होणार आहे. दरम्यान, मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे. मुंबईत आजपासून दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरू होतंय.
 
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्याची मागणी राज्य सरकारने केली आहे. तसा अर्जही राज्य सरकारने न्यायालयात दाखल केला होता. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्याच्या मागणीवर घटनापीठासमोर सुनावणी घेतली जावी, अशी मागणी राज्य सरकारने केली होती. सरकारची ही मागणी मान्य करून पाच सदस्यीय घटनापीठासमोर मराठा आरक्षणविषयक सुनावणी सुरु आहे. पुढील सुनावणी 25 जानेवारी रोजी होणार आहे.