सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (11:57 IST)

रजनीकांत चेन्नईतील रुग्णालयात दाखल

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना गुरुवारी रात्री चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रजनीकांत यांना रुटिन चेकअपसाठी दाखल केल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीनं देण्यात आली.
 
चेन्नईतील कावेरी रुग्णालयात रजनीकांत यांना दाखल करण्यात आलं. त्यांचं रुटिन चेकअप केलं जाणार असून, लवकरच त्यांना घरी सोडलं जाणार असल्याची माहिती, रुग्णालयाच्या वतीनं देण्यात आली.
 
रजनीकांत यांनी काही महिन्यांपूर्वी आरोग्याच्या कारणामुळंच त्यांनी स्थापन केलेली राजकीय संघटना बंद करत राजकारणातून बाहेर पडत असल्याचं सांगितलं होतं.