गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

आशा भोसले यांनी मानले स्मृती इराणीचे आभार, शपथविधी सोहळ्यात गर्दीत फसल्यावर केली मदत

राष्ट्रपती भवनात पीएम नरेंद्र मोदींचे शपथविधी समारंभात राजकारणातील लोकांव्यतिरिक्त दुसर्‍या क्षेत्रातील सुमारे 8 हजार लोकांनी भाग घेतला. या सोहळ्यात बॉलीवूडचे अनेक कलाकार दिसले. समारंभ संपायला सुमारे 9 वाजून गेले. या दरम्यान सेलिब्रिटीजला गर्दीला सामोरं जावं लागलं.
 
याबद्दल प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी स्वत: सोशल मीडियावर सांगितले की गर्दीत अडकल्यावर त्यांच्या मदतीसाठी स्मृती इराणी पुढे आल्या. स्मृती यांसोबत एका फोटो शेअर करत आशा भोसले यांनी लिहिले की 'पीएम मोदींच्या शपथ विधी सोहळ्यात मी गर्दीत अडकले होते. स्मृती इराणी व्यतिरिक्त कोणीही माझ्या मदतीसाठी पुढे आलं नाही. स्मृतीने माझी अवस्था बघितली आणि मी घरी सुखरूप पोहचावी हे सुनिश्चित केले. तिला काळजी आहे म्हणूनच ती जिंकली आहे.'
 
आशा भोसले यांच्या या ट्विटनंतर स्मृती इराणी यांनी हात जोडलेलं इमोटिकॉन शेअर केले.
 
पीएम मोदींच्या शपथविधी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात बॉलीवूड कलाकार सहभागी झाले. या समारंभात शाहिद कपूर, करण जोहर, रजनीकांत, बोनी कपूर, राजकुमार हिरानी, कपिल शर्मा, अभिषेक कपूर, राकेश ओम प्रकाश मेहरा, सिद्धार्थ रॉय कपूर, आणि राजकुमार हिरानी यांच्यासह अनेक सेलिब्रिटीज सामील झाले.