कोरोना व्हायरसमुळे Bigg Boss मध्ये मोठा बदल

Last Modified सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (14:07 IST)
बिग बॉस म्हणजे भांडण, वादावादी, गॉसिप्स, आणि धमाल मनोरंजनाने भरलेला बहुचर्चित अशा हा शो एका नव्या पर्वणीसह प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा सज्ज होण्याचा मार्गावर आहे. यंदा बिग बॉसच्या या चौदाव्या पर्वाला 'बिग बॉस 2020' हे शीर्षक देण्यात आले आहे. यंदाच्या या पर्वात काय नवे असणार, थीम कशी असणार या बाबत सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

एकाच घरात तीन ते चार महिने अनोळखी माणसांबरोबर राहण्याचा हा उपक्रम प्रेक्षकांना फार आवडला. आता बिग बॉसचं नवं पर्व लवकरच सुरू होणार आहे.

पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या शो मध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. यंदाच्या या पर्वामध्ये हा शो पूर्वीसारखा एका तासाचा नसून फक्त अर्धा तासाचा असणार असे समजत आहे. सध्या सामाजिक अंतर राखणे हे महत्त्वाचे असून या शो मध्ये सर्व एकत्र राहणार, त्यामुळे हे नियम पाळणे एका आहवानात्मक आहे. त्यामुळे या शो मध्ये नव्यानव्या गोष्टी प्रेक्षकांना दिसून येणार आहेत.
सध्या या शो ची जय्यत तयारी सुरू झाली आहे आणि सलमान खान देखील एका दमदार भूमिकेत दिसून येणार असून त्यांनी या शो च्या प्रोमोचं शूटिंग त्यांचा फार्म हाउस वर केलं होतं. बिग बॉस साठी केलेल्या प्रोमोचे शूट बघून प्रेक्षकांच्या अपेक्षा अजून उत्कंठेला लागल्या आहेत.

बिग बॉसच्या सूत्रसंचालनासाठी सलमान खान यांना तब्बल 250 रुपये कोटी मानधन देण्यात आल्याचं समजत आहे. त्यांनी आपले मानधन वाढविल्याचे समजत आहे. सलमान आठवड्यातून एकदाच दोन भागाचं चित्रीकरण करण्याचे बोलले जात आहे.

या कार्यक्रमाचे प्रसारण सप्टेंबरच्या शेवटी सुरू करण्याचे होते पण या कार्यक्रमाला उशीर होण्याचे दिसून येत आहे.

मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये बिग बॉसचं चित्रीकरण तयार केलेल्या एका घरात करण्यात येतं, पण सध्या सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे हे शक्य होतं नाही. त्यामुळे अडथळे येतं आहे. पाऊस थांबल्यावर घर बांधणीचे कामास पुन्हा वेग येईल.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

यामुळे साराने मोडलं सुशांतसोबतचं नातं

यामुळे साराने मोडलं सुशांतसोबतचं नातं
मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या 'केदारनाथ' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या सारा ...

‘रोल…कॅमेरा…ऍक्शन’ साठी ‘चंद्रमुखी’ होणार सज्ज!

‘रोल…कॅमेरा…ऍक्शन’ साठी ‘चंद्रमुखी’ होणार सज्ज!
महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झाला त्या दरम्यान प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘प्लॅनेट ...

गौरी खानचा खुलासा - मन्नतमध्ये झालेले काम दिल्लीहून ...

गौरी खानचा खुलासा - मन्नतमध्ये झालेले काम दिल्लीहून नियंत्रित करते, कर्मचार्‍यांना कॉलद्वारे ऑर्डर मिळतात
मुंबई बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आजकाल आपला बहुतांश वेळ कुटुंबासमवेत घालवत आहे. आजकाल ...

#LataMangeshkar : लता मंगेशकरबद्दल 20 रोचक तथ्य

#LataMangeshkar : लता मंगेशकरबद्दल 20 रोचक तथ्य
जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किमान एक पंचमांश लोकांचे जगणे संपन्न करणारा एकच स्वर आहे तो ...

'BigBoss -14 'काय सांगता, बिग बॉसने चक्क नियम मोडला

'BigBoss -14 'काय सांगता, बिग बॉसने चक्क नियम मोडला
बिग बॉस पर्व 14 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दर वर्षी या शो मध्ये काही न काही ...