रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘भारत अने नेनू’ ने २ दिवसात १०० कोटींचा गल्ला जमवला

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूची मुख्य भूमिका असलेल्या ‘भारत अने नेनू’ Bharat Ane Nenu या तेलगु चित्रपटाने अवघ्या दोन दिवसात १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. मैलाचा दगड ठरणाऱ्या हा चित्रपट कोरटला शिवा यांनी दिग्दर्शित केला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरात ५३ कोटींची कमाई केली. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही महेश बाबूचे असंख्य चाहते असून अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही चित्रपटाने चांगला गल्ला जमवला आहे. ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत ‘भारत अने नेनू’ पाचव्या स्थानावर आहे. 
 
या चित्रपटाच्या टीझरने विश्वविक्रम केला होता. जगभरात सर्वाधिक ‘लाइक्स’ मिळवणाऱ्या चित्रपटांच्या टीझरच्या यादीत महेश बाबूच्या या चित्रपटाचा टीझर दुसऱ्या क्रमांकावर होता. कोरटला शिवा दिग्दर्शित या चित्रपटाच्या कथानकाची पार्श्वभूमी राजकारणाशी संबंधित आहे. यामध्ये महेश बाबूसोबत अभिनेत्री कियारा अडवाणीचीही महत्त्वपूर्ण भूमिक आहे. ‘