राजधानीच्या सुरक्षिततेसाठी 1581.90 कोटी
देशाची राजधानी अर्थात दिल्लीच्या सुरक्षिततेसाठी अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये 1581.90 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात दिल्ली पोलिसांना पुढील आर्थिक वर्षात आणखी 156.33 कोटी रुपये मिळणार आहेत. एकीकडे अर्थमंत्र्यांनी सूरक्षादलांसाठी वाढीव अनुदानाची घोषणा केली असली तरी, सूरक्षादलातील जवानासाठीच्या घरकूल योजनेचे अनुदान त्यांनी 30 करोड रुपयांवरून चक्क 10 करोड रुपयांवर आणले आहे.