गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. बजेट 2008
Written By वार्ता|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 27 फेब्रुवारी 2008 (17:36 IST)

रेल बजेटचे 'नो टेन्शन'- वाडिया

रेल्वे मंत्र्यांनी कितीही सवलती देऊ केल्या तरी आम्हाला त्याची किंचितही काळजी नसल्याची प्रतिक्रिया गो एअर विमान कंपनीचे संचालक नेस वाडिया यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या काही वर्षात भारतीय विमान सेवा उद्योगात 33 टक्क्यांची वाढ झाली असल्याचे ते म्हणाले. आणि याच कारणाने रेल्वेमंत्रालयाने सामान्य माणसाला सवलती जाहीर केल्या. वास्तविक पाहता याचा फारसा परिणाम विमान सेवेवर पडणार नसल्याचे वाडिया यांचे म्हणणे आहे.