बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. बजेट 09
Written By वेबदुनिया|

पंतप्रधानांची ५० कोटीची गुरुदक्षिणा

बुधवारी गुरुपौर्णिमा आहे. यापूर्वीच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ज्या विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आणि पहिल्यांदा नोकरी केली, त्या पंजाब विद्यापीठाला ५० कोटीची गुरुदक्षिणा दिली आहे.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले होते. या विद्यापीठासाठी अर्थसंकल्पात ५० कोटीची तरतूद करण्यात आल्याने शिक्षणतज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या विद्यापीठाशी मनमोहन यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून, या विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर मनमोहन यांनी प्राध्यापक म्हणून यात काही वर्षे कामही केले आहे. पंजाब सरकारतर्फे या विद्यापीठाला देण्यात येणाऱ्या निधीत कपात करण्यात आल्यानंतर विद्यापीठाची दुरवस्था झाली होती.

आत बजेटमध्येच यासाठी खास तरतूद करण्यात आल्याने विद्यापीठाने आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली असून, विरोधकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.