शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. बजेट 09
Written By भाषा|

यापूर्वीच दोन प्रो‍त्‍साहन पॅकेजः मुखर्जी

मंदीच्‍या संकटातून देशाला सावरण्‍यासाठी आजच्‍या हंगामी अर्थसंकल्‍पातून सरकार काही तरी प्रोत्‍साहन पॅकेज सादर करण्‍याचा अंदाज वर्तविला जात होता. मात्र याबाबत उद्योग जगताला निराशेचा सामना करावा लागला आहे. मात्र या बजेटमध्‍ये असे काही सादर केले जाण्‍याचा प्रश्‍नच येत नाही अशी स्‍पष्‍ट भूमिका अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी जाहीर केली आहे.

प्रोत्साहन पॅकेजसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्‍या प्रश्‍नावर उत्तर देताना ते म्‍हणाले, की यापूर्वी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंह यांनी दोन प्रोत्‍साहन पॅकेज जाहीर केले आहेत. त्‍यांचा उल्‍लेख मी भाषणात केलाच. लेखानुदानात अशा पॅकेजची घोषणा करण्‍याचे नियोजन नव्‍हतेच तर ते केले जाण्‍याचा प्रश्‍नच येत नाही.