शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. बजेट 09
Written By भाषा|

सरकारची भलावण करणारे बजेटः करात

जगभर मंदीचे पडसाद उमटत असताना सरकारने प्रोत्साहन पॅकेजला बगल देणे हे निश्चितच खेदजनक आहे. सरकारचे म्‍हणणे आहे, की त्‍यांची गोदामे भरली आहेत मात्र याच वेळी सर्वसामान्‍य माणसाच्‍या घरात खायला काहीही नाही, हा विरोधाभास असल्‍याचा आरोप, मार्क्‍सवादी कम्‍युनिस्‍ट पक्षाच्‍या पॉलिट ब्युरोच्‍या सदस्‍या वृंदा कारत यांनी केला आहे.

करात म्‍हणाल्‍या की हंगामी बजेट म्‍हणजे केवळ सरकारने केलेल्‍या कामांचे कौतुक करण्याचा प्रयत्‍न करण्‍यापलीकडे काहीही नाही. सरकारच्‍या दाव्‍यांनंतरही अन्नधान्य उत्पादनात घट आली आहे. तर मोठ्या प्रमाणावर लोक बेरोजगार झाले आहेत. मात्र सरकारने त्‍यासाठी काहीही केलेले नाही.